चांदवड- गुरव समाज संघटनेच्या चांदवड तालुका अध्यक्षपदी संजय रामभाऊ क्षिरसागर (गुरव) यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी चांदवड शहरातील गुरव समाजच्या वतीने क्षिरसागर यांचा सत्कार करण्यात आला यापूर्वी समाजातील उत्तम कामगिरी व विविध पदे व संघटनेसाठी अचूक निर्णय यामुळे या कामाची पावती म्हणून संघटनेच्या पदाधिकारी यांनी चांदवड तालुका अध्यक्ष पदीक्षिरसागर (गुरव) यांची बिनविरोध निवड केली.या वेळी तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष ॲड अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.