नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चांदवड शहर व परिसरात परतीचा ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. सुमारे दोन तास कोसळत असलेल्या पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्त्यावर गुडघ्या येवढे पाणी वाहत असल्याने अनेक दुचाकी व चार चाकी वाहने पाण्यात गेले.
आठवडे बाजारातील पांचाळ वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसले तर या भागातील काही जनावरे वाहून गेले. प्रशासनाच्यावतीने मदत कार्य सुरू आहे. त्याचबरोबर राहूड भागात जोरदार पाऊस झाल्याने राहुडच्या बंधाऱ्याचे धोक्याची पातळी गाठल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे, काढणीला आलेला मका, कांदा, सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्याने बळीराजा हतबल झाला आहे…