चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड- देवळा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच आहेर बंधूंचा संघर्ष टळला आहे. भाजप आमदार डॉ.राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चांदवड – देवळ्यात भाजप तिकिटावरून ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यांनी मोठे बंधू व नाफेड संचालक केदानाना आहेर यांच्या नावाची शिफारस केल्याचेही यावेळी पत्रकार परिषद घेत सांगितले.
या घोषणेमुळे केदा आहेर यांचा भाजपचे तिकिट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ.राहुल आहेर यांची मागणी पक्षश्रेष्ठींनी मान्य केली आहे.
कुटुंबात वाद होवू नये, कुटुंब एकसंघ राहावे यासाठी निर्णय घेतल्याची आ.आहेर यांनी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघा भावात तिकिटासाठी संघर्ष सुरू होता.
डॉ.राहुल आहेर हे माजी मंत्री स्व. दौलतराव आहेर यांचे पुत्र असून ते सलग दोन वेळेस या मतदार संघातून निवडून गेले. त्यानंतर त्यांनी ही मोठी घोषणा केल्यामुळे मतदार संघात त्याची चर्चा आहे.