चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाच्या आगमनाने घराघरात सर्वत्र चैतन्याच वातावरण असतांना सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालेले असते आज बप्पाच्या विर्सजनाचा दिवस त्यामुळे सर्वांचे डोळे पाणावलेले असतांना नाशिकच्या चांदवड येथील कला शिक्षक देव हिरे यांनी परातीत पाण्याखाली रांगोळीच्या माध्यमातून श्रीगणेशाची प्रतिमा साकारत बाप्पाला अनोख्या पध्दतीने विर्सजनाचा निरोप दिला. पोट्रेट पध्दतीने साकारलेली ही रांगोळी साकारतांना हिरे यांना ४ तासा पेक्षा जास्त वेळ लागला. अशा आगळ्या वेगळ्या पध्दतीने कलेच्या माध्यमातून बप्पाला निरोप देणारी ही कलाकृती सर्वत्र चर्चा विषय ठरला.