चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील रापली येथील कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर हा पाच वर्षाचा मुलगा घराच्या अंगणात खेळतांना गायब झाला होता.
रविवारपासून त्याचा शोध नातेवाईकांसह गावकरी घेत होते. सोमवारी जिल्हा पोलिस प्रमुख यांनी भेट देत पहाणी केली होती. तर मनमाड,चांदवड येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी सर्वत्र शोध मोहिम राबविली होती.
अखेर संध्याकाळी उशिरा त्याचा मृत देह त्याच्या शेतातील विहिरीत आढळून आला. सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे यांनी दहा परस खोल विहिरीत उतरत कृष्णा याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. या प्रकरणी पोलिस आता अधिक तपास करीत आहे.