चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालूक्यातील कानमंडाळे येथिल सोळा वर्षीय ऐश्वर्या बाळूबा जाधव या तरुणीचा शेततळ्या पाय घसरुन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संपुर्ण गावावर शोककळा पसरलीय.ऐश्वर्या चांदवडच्या एस एन जी बी कॉलेज मध्ये अकरावीचे शिक्षण घेत होती.ती आपल्या आत्या घरी आलेली असतांना प्राथविधी सकाळी शेततळ्याच्या बाजूने जात असतांना पाय घसरुन शेततळ्यात पडली. मात्र बराच वेळ झाल्याने मुलगी घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतण्याचा प्रयत्न केला असता शेततळ्या जवळ तिच्या चप्पल आढळून आल्याने ककुटूंबातील लोकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना व शेततळ्याचे लिकेज काढणा-यांना बोलवले आणि खोल शेतळ्यातून तिचा मृतदेह बाहेर काढले.चांदवड येथील उपजिल्हा रूग्णालयात तिचा मृतदेह नेला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या प्रकरणी चांदवड पोलिसात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहे.