चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – होळकर राजघराण्यांचे युवराज यशवंतराव होळकर यांनी चांदवड येथे रंगमहालास भेट दिली. युवराज होळकर हे आज नाशिकच्या चांदवड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आल होते. यावेळी त्यांनी रेणुका मातेचे मनोभावे दर्शन घेतले व त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी चांदवड शहरात बांधलेल्या ऐतिहासिक अशा रंगमहाल येथे भेट दिली. रेणुका माता मंदिर व रंगमहाल येथे युवराज होळकर यांच्या हस्ते पूजा व अभिषेक करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नावर बोलले की, अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अहमदनगर शहराला दिल्यास अहिल्यादेवींचे नाव अजून मोठे होण्यास मदत होईल. या प्रस्तावावर शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आम्ही राहू.