चांदडवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील शिवरे येथील एका विधवा महिलेला तोंडाला काळे फासत तिच्या गळ्यात चपलांचा हार घालत तिची धिंड काढण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिलेचा अपघात झाल्यानंतर तिला तिच्या नव-याने माहेरी पाठविले. त्यानंतर काही दिवसात त्याने आत्महत्या केली. नव-याच्या दशक्रिया विधीसाठी ती शिवरे येथे गेली होती. यावेळी तिने नव-याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. यानंतर तेथे जमलेल्या काहींनी तिच्या तोंडाला काळे फासत मारहाण करत गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढली. मात्र इतर जमलेल्या महिलांनी तिची त्यातून सुटका केली. याप्रकरणी चांदवडच्या वडनेर- भैरव पोलिसात पीडित महिलेकडून कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या घटनेबाबत अद्याप कोणतीही नोंद वडनेर-भैरव पोलिस स्टेशन मध्ये झालेली नाही.