चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड येथील राजेश शिंदे हे तहसील कार्यालय रोड ने मोटरसायकल वरुन जात असतांना त्यांच्या गळ्यात मांजा अडकल्याने त्यांचा गळा कापला गेल्याने गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर चांदवड येथे प्रथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मालेगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायलॉन मांज्यावर बंदी असतांना त्याची सर्रास विक्री नाशिक जिल्हयात होत असून त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.