अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
एकीकडे सततच्या पावसाने पीक खराब होत असताना शेतकऱ्या पुढे नवे संकट आले आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी दत्तू गुंजाळ यांनी सहा एकरात मका पिकाची लागवड केली. मका पीक काढणीसाठी आलेला असताना रात्रीच्या वेळेस रानडुकरांचे कळप मका पीकात घुसून पिकांची नासधूस केली. यामुळे गुंजाळ यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सततच्या रानडूकरांच्या वावराने परिसरातील शेतकरी त्रस्त आहे. या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.