अजय सोनवणे, चांदवड
राज्यात मान्सून यायला अवघे काही दिवस शिल्लक असताना नाशिक जिल्ह्यातील काही भागात काल पासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी चार वाजेच्या सुमारास चांदवड शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना यामुळे वेग येणार आहे.