मधूर गुजराथी
चांदवड -चांदवड शहरात दोन दिवसात तब्बल नऊ जणांना कुत्र्यांने चावा घेतल्याने परिसरात घबराट पसरली आहे. गुरुवार व शुक्रवारी तब्बल नऊ जणांना सोमवार पेठ, बाजारपरिसर, खंडेराव मंदिर रोडवर एकाच कुत्र्यांने चावा घेतल्याने नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. चावा घेतलेल्या जखमीची नावे पुढील प्रमाणो स्वरा अजय सोनवणो ( ६) , नीलेश खंदारे (३५), ऋृषीकेश उत्तम सोनवणो (२२), सखाराम जाधव (४३) वडबारे, रतन नामदेव जाधव (५९),मिलींद बनकर (६८),युक्ती मयुर बाफना (१२), रवीमशा शहा (२८) रुचिता भरत कासलीवाल (४०) सर्व चांदवड येथील आहे. या सर्वांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयातऔषधोपचार करण्यात आले . कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भरत कासलीवाल यांनी केली असून या मागणीचे निवेदन चांदवड नगरपरिषदेला दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसापासून मोकाट कुत्र्याने थैमान घातले असून अनेकांना चावा घेतला आहे. चांदवड शहरात सोमवार पेठ हे नेहमीवर्दळीचे ठिकाण असल्याने तेथे दिवसा व रात्री मोकाट कुत्र्यांचा मोठय़ा प्रमाणात संचार होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी देखील महिला व वृध्द खंडेराव मंदिर रोडकडे फिरण्यास जातात तेथे देखील मोठय़ा प्रमाणात कुत्रे भुंकतात त्यांचा त्वरीत बंदोबस्त व्हावा अशी मागणी सोमवारपेठेतील नागरीकांनी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर मांगीलाल कासलीवाल, भरत कासलीवाल, डॉ.सचिन गुजराथी, नीलेश खंदारे, श्रीनिवास सोनवणो, अभिजीत सोनवणो, योगेश सोनवणो, रेवन क्षत्रीय, दीपक व्यवहारे व नागरीकांच्या सह्या आहेत.