मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील १७ वर्षीय तरुणांची आत्महत्येस प्रवृत्त करणा-या दहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगावरोही इयत्ता दहावीत शिकणारा शुभम राजाराम वाकचौरे (१७) गळफास घेऊन आत्महत्या करणा-याचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलीसांनी जाऊन पंचनामा करुन शव चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले.
दरम्यान नातलंगानी शुभमचा मृत्यू बाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर आत्महत्या करण्यास भाग पाडणा-याला जोर्पयत ताब्यात घेत नाही तोर्पयत त्याचे शव ताब्यात घेणार नाही असा पवित्र नातलंगानी पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालय आवारात घेतला. या वादानंतर शुभम वाकचौरे याच्या मृत्यू प्रेमसंबधातून घडला असल्याची चर्चा सुरु झाले. त्यांने संशयीताच्या नावे एक चिठ्ठी लिहुन ठेवल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान शुभमचे वडील राजाराम विश्वनाथ वाकचौरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला या घटनेबाबत फिर्यादी दिली आहे. या फिर्यादीत म्हटले २६ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता विजय बाळासाहेब भोकनळ याने त्याचे मित्र योगेश रमेश वाकचौरे, गणेश बाळु सोनवणे, विठ्ठल वसंत भोकनळ, अक्षय जेऊघाले, गोकुळ बबन भोकनळ, युवराज बबन भोकनळ, बाळासाहेब रामदास भोकनळ, अमोल अशोक भोकनळ, आकाश अशोक भोकनळ यांनी घरासमोर आले व त्यांनी शुभमने पुन्हा मुलीशी चॅटीग केली तर जीवंत सोडणार नाही. माङयाकडे पिस्तुल व तलवार आहे असा दम देऊन गेले.
त्यानंतर पुन्हा रात्री साडेअकरा वाजता या सर्वानी शुभम व वडील राजाराम वाकचौरे, आई सुनीता वाघचौरे, आजी सुमनबाई यांना मारहाण केली. व महिलांची छेडछाड केली. त्यानंतर २७ एप्रिल रोजी मुलगा शुभम यास धमकीचे मेसेज केले. त्यामुळे २८ एप्रिल रोजी पहाटे दोन ते पाच वाजेर्पयत शुभम याने घाबरुन जाऊन राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी दहा जणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मृत शुभमच्या पश्चात आई,वडील, एक भाऊ, आजी असा परिवार आहे.