चांदवड/ देवळा
– चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.राहुल आहेर यांच्या स्थानिक विकासनिधीतून तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर यांचे प्रयत्नातून जिल्हापरिषद निधी तथा नाबार्डच्या निधीतुन खुंटेवाडी, माळवाडी, देऊळवाडी, मटाने, वरवंडी, वाजगाव, देवळा शहरातील किशोर नगर, जामा मस्जिद येथे सामजिक सभागृह, के.टी. वेअर, रस्ता काँक्रीटीकरण, पुल बांधकाम अशा विविध विकासकामांचे उदघाटन खा.डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी आ.राहुल आहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, बापू देवरे, अतुल पवार यांचेसह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.