चांदवड – सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे व तो सुरळीत करण्यासाठी शासन, लोक प्रतिनिधी , प्रशासन सर्वच प्रयत्न करीत आहेत तोपर्यत CTSCAN पेक्षा अधिक महत्वाचे तात्पुरता स्वरूपात का असेना ज्या रुग्णांचे SpO2 92 ते 95 दरम्यान आहे त्यांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीनच्या साहाय्याने जम्बो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नाही. तोपर्यंत सुरक्षित ठेवता येते. त्यामुळे लोकसहभागातून अशा २० ते २५ मशीन उपलब्ध करू शकलो तर अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतील. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन साधारण ३५ ते ४० हजारापर्यंत मिळते. चांदवड मधील काही व्यक्तींनी त्यांच्यातर्फे प्रत्येकी एक मशीन देण्यास संमती दिली आहे ज्यांची क्षमता आहे त्यांनी कृपया पुढे येऊन सहकार्य करावे.
तालुक्यातील सर्व सरपंच, लोकप्रतिनिधी, दानशूर, सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रतिसाद देऊन आपल्या माताभगिणी बांधवांचे जीव वाचविण्यासाठी मदत करा.एका मशिनसाठी तीस,पस्तीस, चाळीस हजार रुपये लागतात फक्त. प्रत्येक गावाने एक किंवा दोन तीन गाव एकत्र येऊन एक जरी मशीन देता आले तरी ही मोठी मदत ठरणार आहे. चांदवड तहसीलदार प्रदीप पाटील व पत्रकार संघाच्या वतीने यासाठी आवाहन करण्यात आले आहे.