चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील वडनेर-भैरव पोलिसांना रात्रीच्या सुमारास ऐका कार मध्ये अवैधरित्या दारूच्या बाटल्या लपवून दोघे जण घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत कार पकडली. या कारच्या मागील सीट खाली व पुढील बाजूस तपासणी केली असता त्यात १० हजार रुपयांच्या इंग्रजी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जवळपास कारसह साडे तीन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
अवैधरित्या दारुच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी दोन महिन्यापूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शना खाली मोठी कारवाई केली होती. त्यात जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी आणि एकाचवेळी जिल्ह्यात विविध तब्बल ४६ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात जवळपास १० लाखाचे दारु, रसायन साहित्य जप्त केले होते. नाशिकच्या राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने जळगावच्या पारोळा नजीक कारवाई करीत बनावट दारु कारखाना उध्वस्त केला होता. या कारवाईत तब्बल दीड कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात करुन २५ जणांविरोधात कारवाई केली होती. त्यामुळे अवैधरित्या दारुवर कारवाई होत असली तरी त्याचा व्यवसाय करणारे मात्र थांबत नाही. आता चांदवड तालुक्यात दारुच्या बाटल्या कारमधून घेऊन जातांना पोलिसांनी पकडले.
अवैध बायोडिझेल अड्ड्यावर छापा
मालेगाव मध्ये आझाद नगर पोलिसांच्या हद्दीतील सरदार नगर मध्ये एका ठिकाणी अवैधरित्या सुरु असलेल्या बायोडिझेल अड्डयावर उपविभागीय पोलिस अधिकारी तेगबीर सिंह यांनी पथकासह जात छापा टाकून २१०० लिटर बायोडिझेल सह अन्य मुद्देमाल असा दीड लाखा पेक्षा जास्त माल जप्त केला आहे. दोन वर्षापूर्वी मालेगाव मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई केली होती. येथे सुरु असलेल्या अनाधिकृत पणे सुरू असलेला बायोडिझेल पंपावर छापा टाका टाकला होता. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे तत्कालिन जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही कारवाई केली होती. अनाधिकृत पंप चालवणा-या आरोपीने मालकीच्या हॉटेल मागे पत्र्याच्या शेड मध्ये हा पंप उभा उभा केला होता. पंपावर मिळणाऱ्या डिझेल पेक्षा १५ ते २० रुपये कमी दराने तो हे बायोडिझेल विकत असे.
वर्षभरापूर्वी दिंडोरी तालुक्यातील जानोरी औद्योगीक वसाहतीत बेकायदा इंधन निर्मीतीचा काराखाना ग्रामिण पोलिसांच्या भरारी पथकाने छापा टाकून उध्वस्त केला होता. या कारवाईत पाच जणांना गजाआड करुन पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातून दोन भरलेले टँकर व प्लॅस्टिक टाक्या भरलेले ज्वलनशील पदार्थ व इतर साहित्य असा १ कोटी एक लाख ६८ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. जिल्ह्यात अगोदरच मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे अनेक व्यवसाय सुरु आहे. त्यात बायोडिझेल विकण्याचा नवा धंद्याने पुन्हा डोके वर काढले आहे. पण, पोलिसांनी पु्न्हा अनाधिकृत व्यवसायाकडे लक्ष वळवले असून ही कारवाई केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सुरु असलेल्या या अनाधिकृत व्यवसायाला आता जरब बसणार आहे.