चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड प्रांताधिकारी कार्यालयावर भारतीय किसान सभेने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात कांद्याला हमी भाव मिळावा,पीक कर्ज तात्काळ मंजूर करावे अशा घोषणा देत हा मोर्चा निघाला. यावेळी वनअधिकार कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, वनखात्याच्या जमिनित पात्र व अपात्र लाभार्थ्यांना वनजमिनीत बांधकाम करण्यास परवानगी द्यावी,केंद्राच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यास मंजूरी मिळावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. हा मोर्चा चांदवडच्या प्रांत कार्यालयावर काढण्यात आला होता. या मागण्या मान्य न झाल्यास बि-हाड आंदोलनाचा इशारा देण्यात आला.