चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील तळेगाव रोही येथील शेतकरी राधाजी सावकार यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या सुमारास पाण्याची भटकती करत असताना. विहिरीत पडल्याने रात्रभर विहिरीतच कोल्ह्याला आपला मुक्काम करावा लागला. ही माहिती बाळासाहेब वाकचौरे यांना माहिती पडतातच त्यांनी तळेगाव रोही येथील पोलीस पाटील यांना कळविले.
त्यानंतर पोलीस पाटलांनी वन विभागाशी संपर्क केला. वनपरिक्षेत्र अधिकारी तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी जाळीच्या सहाय्याने एक ते दीड तासातच कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढले. विहीरीतून कोल्हा आल्यानंतर आपला जीव घेऊन सैरावैरा पळून गेला. यावेळी वनरक्षक नवनाथ बिन्नर, व इतर कर्मचारी वाहन चालक भूरक ,वन मंजूर शिवाजी कदम, अंकुश गुंजाळ, बाळकृष्ण सोनवणे, भाऊसाहेब झाल्टे, पोलीस पाटील अविनाश अहिरे, व समाजसेवक भागवत झाल्टे आदीने मदत केली.
Chandwad Fox Well Forest Rescue Operation