चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथे बिबट्याने अचानक शेतकऱ्यायावर हल्ला केला. त्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे. भगवंत गोविंद चौधरी असे जखमी शेतक-याचे नाव आहे. आज सकाळी ते शेतात असलेल्या विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शेतात दबा धरुन असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला.
सुदैवाने त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांच्या जबड्याला, पाठीला, हाताला मोठ्या जखमा झाल्या आहेत. चौधरी यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक धावत आले. त्यांनी बिबट्याला पाहिल्यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र शेतातून पळत बिबट्याने सर्वाना गुंगारा दिला. दरम्यान जखमी शेतक-यावर चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून गामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
? *राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडिया सेलचे प्रमुख कारसह बेपत्ता*
पत्नीची गंगापूर पोलिसात धाव
https://t.co/ENBsFIPdzI#indiadarpanlive #nashik #ncp #youth #media #cell #chief #missing #politics— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 3, 2023
Chandwad Farmer injured in Leopard Attack