चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीने सर्वांचे लक्ष वेधले असले तरी या मतदार संघात भाजपने नकार दिलेल्या केदा नाना आहेर यांनी सर्व उमेदवारांना धडकी दिली आहे. आमदार डॅा. राहुल आहेर यांनी उमेदवारी न करण्याची घोषणा केल्यानंतरही भाजपने केदानाना आहेर यांची उमेदवारी नाकारुन पुन्हा विद्यमान आमदारालाच संधी दिल्यामुळे त्याचे पडसाद आता मतदारांमध्ये उमटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नानाला ना म्हणणारे भाजपवर संतापले आहे. त्यामुळे हे मतदार आता केदानानाला हा म्हणत आहे.
या मतदार संघात भाजपने विद्यमान आमदार डॅा. राहुल आहेर, काँग्रेसने शिरीष कोतवाल व प्रहारने गणेश निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदार संघात चौरंगी लढत असली तरी केदानाना आहेर यांचे पारडे आजतरी जड आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत त्यांनीच डॅा. राहुल आहेर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यानंतर त्यांनीच या मतदार संघात नेमकी काय कामे हवी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आमदार डॅा. राहुल आहेर असले तरी जमीनीवर मात्र केदानाना आहेरच संपर्कात होते. त्यामुळे त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होतांना दिसत आहे.
केदानाना आहेर बरोबर माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, भाजपचे डॅा. आत्माराम कुंभार्डे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी, कवी व धनगर समाजाचे नेते देविदास चौधरी हे सुध्दा रिंगणात उतरले आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड झाले आहे. चांदवड विधानसभा मतदार संघात चांदवड व देवळा या दोन तालुक्यांचा समावेश आहे. देवळा तालुक्यात पहिल्यापासूनच केदानाना आहेर यांचे वर्चस्व होते. पण, आता त्यांना चांदवड तालुक्यातल्या मतदारांनी साथ दिल्यामुळे केदानाना यांच्या उमेदवाराची धडकी सर्वच उमेदवाराला बसली आहे. तर भाजपला त्यांचे बंड महागात पडले आहे.