अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
चांदवड तालुक्यातील पाटेगाव शिवारातील नारायणगाव येथील कारभारी रायबा ठोके यांनी मुला सोबत झालेल्या भांडणात मुलाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जोरदार प्रहार केल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. कारभारी यांचा मुलगा रविंद्र याला दारूचे व्यसन होते. दारु पिल्यानंतर तो घरी येऊन माझे लग्न लावून द्या अशी विचारणा तो आपल्या वडिलांकडे सातत्याने करीत असत. मात्र तू अदोगर दारु सोड असे त्याला सांगण्यात येत असत. रविवारी संध्याकाळी रविंद्र दारु पिऊन आल्यावर पुन्हा याच विषयावरुन दोघा बाप-लेकात जोरदार भांडण झाले. त्यात रविंद्र याने आपल्या वडिलांना शिवीगाळ केली,नेहमीच्या या प्रकारान संतापलेल्या बापाने मुलाला लोखंडी पाईप, प्रहारीने जबरदस्त मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.