निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नसराईत वेगवेगळ्या शक्कल लावत नवरदेव आपल्या नवरींना आपल्या घरी घेऊन जात असतात. अशातच निफाड तालुक्यातील उंबरखेड येथील नवरदेवाने कार सोडून चक्क बिदाई नंतर आपल्या लाडक्या नवरीला बैलगाडीत बसून आपल्या घरी नेले. त्यामुळे या अनोख्या बिदाईची सर्वत्र मोठी चर्चा झाली आहे.
निफाड तालुक्यातील उंबरखेड येथील रमेश रघुनाथ गवळी यांचे चिरंजीव अक्षय तसेच दत्तात्रेय प्रभाकर कागदे यांची मुलगी हिनल या दोघांचा शुभविवाह संपन्न झाला आहे. लग्नात दिवसभर लग्नाचे विविध कार्यक्रम झाल्यानंतर ज्यावेळेस बिदाईची वेळ आली त्यावेळी वऱ्हाडी मंडळींनी सजवलेल्या बैलगाडीत नवरदेवाने आपल्या नवरीला बसवत आपल्या घरी घेऊन गेला.