चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील आराध्यदैवत श्री खंडेराव महाराजांच्या चंपाषष्ठी निमित्त यात्रोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. यानिमित्त सायंकाळी ४ वाजता बारागाड्याचे आयोजन करण्यात आले होते. बारागाड्या ओढण्याच्या वेळी एक नागरिक बैल गाड्या खाली जात असताना काही नागरीकांनी समयसूचकता दाखवीत त्यांना सावरल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांनतर श्री खंडेराव महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हाराचा जयघोष अन भंडाऱ्याची उधळण करीत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकभक्तांनी मोठी गर्दी केली होती.