चांदवड (इंडिय दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या चांदवड येथून युवा महोत्सवाचा कार्यक्रम करून नाशिक येथील उद्धवजी मराठा बोर्डिंग येथे असणाऱ्या सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगसाठी नाशिककडे येत असताना चांदवड टोल नाक्याच्या पुढे अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यावेळी डॅा. पवार यांनी आपल्या पथकातील गाड्या तातडीने थांबवून अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत केली.
त्यानंतर रुग्णांना रुग्णावाहिकेतून रुग्णालयाकडे रवाना करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन संबंधितांना निर्देशही दिले. डॉ. पवार यांच्याबरोबर असणारे त्यांचे अंगारक्षक, स्वीय सहाय्यक यांनी अपघातग्रस्तांना तातडीची मदत देऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. केंद्रीय मंत्री असतानाही प्रोटोकॉलचा विचार न करता अपघातग्रस्तांसाठी त्या धावून आल्या….