चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड विधानसभा मतदार संघात भाजपचे डॅा. राहुल आहेर यांनी विजय मिळवला. या मतदार संघात चौरंगी लढत होती. त्यामुळे ती चुरशीची ठरली. विशेष म्हणजे राहुल आहेर यांचे चुलत भाऊ केदा नाना आहेर यांनी बंडखोरी करत उमेदवारी केल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. पण, राहुल आहेर यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत राहुल आहेर यांना १ लाख १ हजार ४१७ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रहारचे उमेदवार गणेश निंबाळकर यांना ५० हजार ३८१ मते मिळाली. तर तिस-या क्रमांकाची मते केदा नाना आहेर यांना मिळाली. त्यांना ४७ हजार ३७५ मते तर काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांना २२ हजार १५९ मते मिळाली. बघा संपूर्ण मतांचा तक्ता….