शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

by Gautam Sancheti
जून 10, 2025 | 6:53 am
in मुख्य बातमी
0
Untitled 26

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली जिल्ह्यातील उबाठा गटाचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सोमवारी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. आपण आता नकली आखाड्यातून खऱ्या आखाड्यात उतरलो आहोत, असे सांगत त्यांनी प्रवेश केला.

पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी संतोष आबा वेताळ, पैलवान विकास पाटील, सायगावचे उरसरपंच सागर वंजारी, सुरलीचे उपसरपंच कृष्णात भादणे, अमोल घोगे, सुशांत जाधव, संजय कांबळे, लक्ष्मण मंडळे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, दिपाली सय्यद तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, तीन वर्षांपूर्वी उठाव झाल्यानंतर माझ्यावर दररोज आरोप झाले, पण मुख्यमंत्री असताना आरोपाला प्रत्यारोपाने नाही, तर कामातून उत्तर दिले. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने या कामांना ऐतिहासिक प्रतिसाद दिला आणि महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या. ही शिवसेना वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना आहे, टोमणेसम्राटांची नाही असे याप्रसंगी निक्षून सांगितले.

पैलवान चंद्रहार पाटील हे आता कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आले आहेत. चंद्रहार पाटील यांनी मराठी मातीचा खेळ असलेल्या कुस्तीला लौकिक मिळवून दिला. पैलवान हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मी जरी पैलवान नसलो तरी २०२२ मध्ये समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले आहे. तेव्हा असे डावपेच टाकले की ते अद्याप उठले नाहीत. पैलवानांना डावपेच माहित असतात. कुस्तीला बळ देण्यासाठी त्याला राजकीय पाठिंबा आवश्यक आहे. चंद्रहार पाटील यांचा आखाडा मंत्री उदय सामंत यांनी बघितला आहे. चंद्रहार पाटील यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आता शिवसेनेची आहे असे यावेळी आवर्जून नमूद केले. सीमेवरील जवानांसाठी दिल्लीत रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प चंद्रहार पाटील यांनी केलाय. त्यांची देशभक्ती पाहता दिल्लीत काय काश्मीरमध्ये रक्तदान शिबीर घेऊ असेही याप्रसंगी जाहीर केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंना दिलं खुलं आव्हान…हिंमत असेल तर असे सांगत दिले प्रत्त्युत्तर

Next Post

रणधुमाळी जिल्हा परिषदेची…नाशिक जिल्ह्यात महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांविरोधातच लढणार…महाविकास आघाडीचे काय?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची…नाशिक जिल्ह्यात महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांविरोधातच लढणार…महाविकास आघाडीचे काय?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011