इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या विक्रम लँडरने उडी मारली आणि त्याचे सॉफ्ट लँडिंगही झाले. इस्रोने हा अभिनव प्रयोग यशस्वी करुन आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. हे एक आव्हानात्मक कार्य होते. पण ते यशस्वी झाले आहे. याचा व्हिडिओ इस्रोने जारी केला आहे.
इस्रोने माहिती दिली की चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने पुन्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. वास्तविक, विक्रम लँडरने होप टेस्ट म्हणजेच जंप टेस्ट (उडी मारणे) यशस्वीरीत्या पार पाडली. या अंतर्गत, इस्रोच्या आदेशानुसार, विक्रम लँडरने इंजिन सुरू केले आणि अपेक्षेप्रमाणे, स्वतःला ४० सेंटीमीटरली उडी मारली. नंतर पुन्हा ३०-४० सेमी अंतरावर उतरले. इस्रोने या प्रक्रियेचे वर्णन किक-स्टार्ट म्हणून केले आहे.
भविष्यात लँडर आणि मानवी मोहिमांच्या पुनरागमनासाठी या प्रयोगाला खूप महत्त्व असल्याचे इस्रोने म्हटले आहे. या प्रयोगानंतर लँडर विक्रमची सर्व यंत्रणा सामान्यपणे काम करत आहे. चाचणी दरम्यान, ChaSTE आणि ILSA ला कमांड देऊन लँडरवरील पेलोड दुमडला गेला आणि सॉफ्ट लँडिंगनंतर पुन्हा तैनात केला गेला. इस्रोने सांगितले की, या प्रयोगामुळे चांद्रयान-३ मोहिमेने अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी केली आहे.
बघा हा व्हिडिओ
रोव्हरने काम पूर्ण केले
चांद्रयान-३ ने आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे आणि त्याचे मिशन जवळपास पूर्ण झाले आहे. आता चंद्रावर रात्र पडू लागली आहे आणि लवकरच तिथे अंधार होईल. इस्रोने सांगितले की प्रज्ञान रोव्हरने आपले काम पूर्ण केले आहे आणि सुरक्षित ठिकाणी पार्क करून स्लीप मोडमध्ये सेट केले आहे. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो आणि रात्रही तितकीच लांब असते. म्हणजेच चंद्रावर १४ दिवस रात्र असते. तर १४ दिवस प्रकाश असतो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान रात्री उणे २३८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. अशा परिस्थितीत रोव्हर आणि लँडर इतक्या कमी तापमानात काम करू शकणार नाहीत. जेव्हा चंद्रावर रात्र निघून जाईल, तेव्हा लँडर आणि रोव्हर पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु याबद्दल फारशी आशा नाही.
Chandrayaan3 Lunar Surface Vikram Lander Jump Hop Experiment
Moon Space ISRO Success Mission
Vikram Lander exceeded its mission objectives. It successfully underwent a hop experiment.
On command, it fired the engines, elevated itself by about 40 cm as expected and landed safely at a distance of 30 – 40 cm away.
Importance?: This ‘kick-start’ enthuses future sample return and human missions!
All systems performed nominally and are healthy. Deployed Ramp, ChaSTE and ILSA were folded back and redeployed successfully after the experiment.