नाशिक – भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील हे १७ जुलै पासून तीन दिवशीय नाशिक दौऱ्यांवर आहेत. आज त्यांनी सकाळी ११ वाजता नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी त्यांनी नाशिक महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर सकाळी झालेल्या भेटीबाबतची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरेंसोबत फक्त हवापाण्याच्या गप्पा नाही मारल्या. त्यांच्यासोबत परप्रांतीयांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. माझ्या परप्रांतीयांच्या विषयाचा विपर्यास झाला, असे राज ठाकरे यांनी सांगितले, त्याची लिंकही ते पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
– नाशिक महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार
– राज आणि माझी जुनी मैत्री, आज सदिच्छा भेट झाली
– राज आणि माझ्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही
– कोविड काळात भाजपनं मोठं काम केलं
– सेवा ही संघटना हे मोदींजींनी सांगितलं
– पक्ष संघटना बळकटीसाठी दौरा
– महापालिका निवडणुकीची तयारी सुरू
– महापालिका निवडणुका कधीही झाल्या तरी आम्ही तयार
– ईडी स्वायत्त संस्था, अनिल देशमुखांवरील ईडी कारवाईबाबत मी फार काही त्याबाबत बोलणार नाही
– कोरोना अजून संपलेला नाही
– दौऱ्यादरम्यान गर्दी कमी करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन करतोय
– पक्षातील नवीन आणि जुन्या लोकांचा बॅलन्स राखणं, कठीण काम, मात्र आम्ही ते करतोय
– मनसेसोबत युती करण्याबाबत पक्षात मंथन करावं लागेल
– मात्र आगामी निवडणुकीत १६० जागा स्वबळावर निवडून आणण्याची आमची तयारी सुरु आहे.
– राजसोबत फक्त हवापाण्याच्या गप्पा नाही मारल्या
– राज यांच्यासोबत परप्रांतीयांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली
– माझ्या परप्रांतीयांच्या विषयाचा विपर्यास झाला, असे राज ठाकरे यांनी सांगितले, त्याची लिंकही ते पाठवणार आहेत
– आम्ही अन्य छोट्या संघटनांना मंत्रीपद देऊ शकतो, तर राज ठाकरे हे तर मोठे नेते
– संजय राऊत कशावरही बोलू शकतात
– ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवरही बोलू शकतात
– ते मोठे नेते आहेत, आम्ही लहान कार्यकर्ते आहोत
– युतीची चर्चा उभ्या उभ्या होत नसते
– पवार-मोदी भेटीला राजकीय रंग देण्याची गरज नाही
– गिरीश महाजन राज्याचे नेते
– उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचं काम गिरीश महाजन यांच्या सल्ल्याने जयकुमार रावल करतील
– ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मी आणि देवेंद्रजी दोन दिवस दिल्लीला जाणार
– राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ सुरु आहे.
– राज्याचा प्रश्न माझ्या आवाक्याबाहेर, केंद्राकडे सोपावलाय
– आम्ही मुसलमान विरोधी नाही
– मात्र,त्यांचं लांगुलचालन करत नाही
– राज्यातील सर्व साखर कारखाने धोक्यात
– केंद्रानं अनेक पॅकेज दिले
– सहकारात केंद्र सहकार समृद्ध करण्यासाठी
– इंधनावर केंद्र कर घेतो त्यात सर्व प्रोसेस असतात
– राज्याला ते खर्च नसतात,मिळणारे कर उत्पन्न पूर्ण उत्पन्न असतं
– राज्याने १० रुपये कमी करावे मी केंद्राला मागणी करतो
– मुख्यमंत्र्यांना आषाढीला पूजा करण्याचा अधिकार
– तो आम्हाला,सगळ्यांना मान्य
– मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला एसटी बसने जावे ही अध्यात्मिक आघाडीची मागणी ही वारकऱ्यांची भावना
– ती शब्दशः कोणी घेऊ नये
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/2092777777528258/