नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथील सुपरिचित बांधकाम व्यावसायिक प्रतिष्ठान मे.बागड प्रॉपर्टीज व बागड असोसिएट्सचे संचालक चंद्रकांत रामचंद्र बागड यांचे निधन झाले. शनिवारी त्यांनी सकाळी १०.४६ वाजता वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजाराने निधन त्यांचे निधन झाले. दुपारी ४ वाजता त्यांचा अंत्यविधी व्दारका येथील अमरधाम येथे होणार आहे.
चंद्रकांत रामचंद्र बागड यांचे मूळ गाव – सटाणा असून त्यांनी प्रतिकुल परिस्थीतीत बांधकाम व्यवसायात यश मिळवले. त्यांच्या पश्चात मुलगा
अजिंक्य चंद्रकांत बागड, मुली व पुतणे नातू आहेत. बागड यांना चार भाऊ आहे. त्यात सूर्यकांत रामचंद्र बागड यांचे अगोदरच निधन झाले. तर राजेंद्र रामचंद्र बागड, विलास रामचंद्र बागड, दीपक रामचंद्र बागड, अनुपकुमार रामचंद्र बागड हे विविध क्षेत्रात कार्यरत आहे.