मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मालेगाव येथील बानूबाईच्या चंदनपुरी येथील पुरातन श्री खंडोबा महाराजांच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे. मानक-यांच्या घरातून देवाच्या मुखवट्यांची पालखी निघून मंदीरात मुखवटे नेण्यात आले. भंडा-याची उधळण करीत येळकोट येळकोटचा गजर करीत असंख्य भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पौष पौर्णिमे पासून पंधरा दिवस चालणा-या या यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्रातून भाविकांची गर्दी होत असते. दरम्यान जिल्हायाचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक पुजा आरती होऊन खंडोबाची तळी भरण्यात आली.