पोलीसप्रमुख सचिन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
चांदोरी – कोरोनाचा धोका वाढत असताना शासन स्तरावरून नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावावा आणि शुभविवाहानिमित्त याविषयी जनजागृती व्हावी,यासाठी डोंगरवाडी दारणा सांगवी ता निफाड येथील रोहम कुटुंबियांनी वाल्मिक रोहम यांची कन्या माधुरी हिचा विवाह १० फेब्रुवारी रोजी निरपूर ता सटाणा येथील संजय चव्हाण यांचा मुलगा सौरभ सोबत संपन्न झाला. मात्र, राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याने शासनस्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच,नागरिकांना लसीकरणाचे आवाहनदेखील केले जाते आहे.रोहम कुटुंबियांनी सामाजिक भान राखत शासनाच्या प्रयत्नांना आपल्या कार्याच्या माध्यमातून हातभार लागावा यासाठी मुलीच्या विवाह निमित्ताने लसीकरणाबाबत संदेश देत लसीकरण केले.
लग्नात होत असलेल्या लसीकरणाच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील,अँड नितीन ठाकरे,जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे,डॉ प्रल्हाद डेर्ले,जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक पिंगळे,सरपंच कांतीलाल बोडके,सुनील साळवे,पोलीस पाटील गोरक्षनाथ काकड,सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी,तलाठी कल्पना पवार आदींच्या हस्ते या लग्न मंडपातील लसीकरणाचा शुभारंभ झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र चांदोरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ ज्योती फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक अरुण कहांडळ,आरोग्य सेविका प्रिती इंगळे,धनु दरेकर,आशा सेविका वर्षा आहेर यांनी लसीकरण केले.
….
नवीन पायंडा पाडला
रोहम व चव्हाण परिवाराने लग्ना निमित्ताने लसीकरण करत प्रशासनाला सहकार्याचा नवीन पायंडा पाडला. कौतुकास्पद असा निर्णय इतरांनीही याचे अनुकरण करावं.
सचिन पाटील
ग्रामीण पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
….
विवाहाच्या निमित्ताने लसीकरण कॅम्प
आरोग्य सेवा करताना प्रामुख्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्याला प्राधान्य देत आहोत.आजही विवाहाच्या निमित्ताने लसीकरण कॅम्प लावला.
अरुण कहंडाळ, आरोग्य साहाय्यक