मुंबई – चांदीवाल आयोगारमोर गैरहजर राहणार्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधीत चांदिवाल आयोगाने वॉरंट जारी केले आहे. या वॅारंटमुळे परमबीर सिंह यांना आयोगापुढे हजर राहून जामीन मिळवावा लागणार आहे. वारंवार निर्देश देऊनही सिंह आयोगापुढे उपस्थितीत राहत नसल्यामुळे आयोगाने हे कडक पाऊल उचलले आहे. दरम्यान परमबीर यांनी चांदिवाल आयोगाच्या चौकशीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पण, त्याची अद्याप सुनावणी सुरु झालेली नाही.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमला. या आयोगाने आपले काम सुरु केल्यानंतर परमबीर सिंह चौकशीला सातत्याने गैरहजर राहिलेत. आयोगान त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. पण, तेही त्यांनी दिले नाही. त्यामुळे आयोगाने आता हे कडक पाऊल उचलले आहे. हे कडक पाऊल उचलतांना आयोगाने राज्याचे पोलील महासंचालक यांना याप्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी एका जेष्ठ अधिका-याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. याअगोदर आयोगाने जून महिन्यात परमबीर यांना ५ हजारांचा, १९ ऑगस्टला २५ हजाराचा आणि २५ ऑगस्टला पुन्हा २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. आता या वॅारंटमुळे परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार आहे.