इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बराच गदारोळ झाला आहे. पंजाब पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीला अटक केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी रात्री चंदीगड विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी जोरदार निदर्शने केली. एका विद्यार्थिनीने वसतिगृहात आंघोळ करताना मुलींचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावाही आंदोलकांनी केला. मात्र, पोलिसांनी याचा इन्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका विद्यार्थिनीला अटक केली आहे. मोहालीचे पोलिस अधिक्षक विवेक सोनी म्हणाले, “एका विद्यार्थिनीनेच व्हिडीओ शूट करून व्हायरल केल्याचे प्रकरण आहे. एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपी विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. या घटनेशी संबंधित कुठल्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. वैद्यकीय नोंदीनुसार , आत्महत्येचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. रुग्णवाहिकेत नेण्यात आलेली विद्यार्थिनी चिंतेत होती. आमची टीम तिच्या संपर्कात आहे.”
पंजाबचे उच्च शिक्षण मंत्री गुरमीत सिंग मीत हरे यांनी रविवारी चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस अधिक्षक पुढे म्हणाले की, “फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. आतापर्यंत आमच्या तपासात असे समोर आले आहे की आरोपीचा एकच व्हिडिओ आहे. तिने इतर कोणाचाही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नाही. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील. एका विद्यार्थिनीच्या व्हिडिओशिवाय अन्य काही आमच्या निदर्शनास आलेले नाही.”
https://twitter.com/amvrish_kum2/status/1571421096754442241?s=20&t=UrOHypLbToA5RifhY4k3cw
Chandigarh University Girl Viral Video Police Investigation