चांदवड – येथील राहुड गावातील हनुमान मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला व मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य फौजी वाल्मिक पवार यांनी गावातील समस्या आपल्या मनोगतात मांडल्या. जीम साहित्य,तलाठी कार्यालय व बौद्ध विहार बांधून देण्याचे आमदार राहुल आहेर यांनी आश्वासन दिले आहे.
यावेळी चांदवड नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समिती सभापती पुष्पाताई धाकराव,माजी उपसभापती डॉ.नितीन गांगुर्डे, तालुकाअध्यक्ष मनोज शिंदे, कृषी अधिकारी विलास सोनवणे, विजय धाकराव,बाळासाहेब वाघ,अशोक भोसले, ग्रामसेवक भारती चिते, रेखा सोमवंशी,आप्पा वानखेडे, कृषिसेवक नवले, सरपंच अजय पवार, सागर आहिरे,प्रा.राजेंद्र सोमवंशी,खंडू सोमवंशी,कैलास सोमवंशी,रमेश पवार,सचिन निकम, वाल्मिक वानखेडे,कैलास गुंजाळ,संजय पाडवी,नामदेव पवार,सुखदेव सोमवंशी,गौतम कापडणे, धर्मा सोमवंशी,बापू सोमवंशी,नाना पवार,केशव पवार,माणिक पवार, जनार्दन पवार,भिलू पवार, वाल्मिक पवार , सोमनाथ गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू थोरे यांनी केले.