मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खंडेरायाच्या जेजूरी नंतर नाशिकच्या मालेगाव येथील बानूबाईच माहेर असलेल्या चंदनपुरी येथे चंपाषष्टी निमित भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. चंदनपुरी येथे श्री खंडेराव महाराज, म्हाळसा देवी व बानूबाईच पुरातन मंदीर असून दर रविवारी येथे कोटम भरणे, तळी भरणे कार्यक्रम होत असतात. चंपाषष्टी निमित्त दर्शनाला भाविकांची गर्दी झाली होती. अनेकांच खंडोबा महाराज कुलदैवत असल्यान संपुर्ण कुटूंब येथे आपले देव भेटीला आणतात आणि तेथे तळी भरतात.
https://youtu.be/EOWYTYwHcTE