इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आचार्य चाणक्य यांनी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींची उल्लेख नीतीशास्त्रात केला आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीती आजगी प्रासंगिक आहेत. चाणक्य यांनी माणसाने कोणत्या गोष्टी शेअर करू नये, हे एका श्लोकाद्वारे सांगितले आहे. या पाच गोष्टी कोणत्या ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया…
१) पती-पत्नीमधील रहस्ये
चाणक्य सांगतात, की पती-पत्नीमधील काही गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला सांगू नये. सुखी वैवाहिक जीवनासाठी कोणीही आपल्या गोष्टी इतरांना सांगू नये.
२) अपमानाची गोष्ट
आचार्य चाणक्य सांगतात, की कोणत्याही व्यक्तीसोबत आपल्या अपमानाची गोष्ट शेअर केली जाऊ नये. कारण असे केल्याने तुमची प्रतिमा मलीन होऊ शकते. आपल्या अपमानाची गोष्ट सांगितल्याने समाजातील मान कमी होऊ शकतो.
३) आर्थिक नुकसान
चाणक्य सांगतात, की जर कोणत्यातरी कारणाने तुमचे आर्थिक नुकसान झाले असेल, तर याबाबत कोणालाही सांगू नये. अशा परिस्थितीत तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. त्यामुळे नागरिक तुमच्यापासून चार हात लांब राहतील.
४) आपले दुःख
आपले त्रास, दुःख इतरांना शेअर करू नये. चाणक्य सांगतात, की साधारणतः मदत करण्याऐवजी अनेक जण संबंधिताचा उपहास करतात किंवा टीका करतात. त्यामुळे प्रत्येकाला आपले दुःख सांगत बसू नये.
५) धन-संपत्तीबद्दल
चाणक्य सांगतात, की आपल्या धनसंपदेबाबत प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. कारण असे लोकांमध्ये तुमच्याबद्दल ईर्ष्या निर्माण होऊ शकते.