मुंबई – प्रत्येकाला आपल्या आयुष्यात परफेक्ट लाईफ पार्टनरचा शोध असतो. अर्थात संसार दोन चाकांवर असतो. दोन्ही चाक समान राहिले तर छान, नाहीतर गडबड झालीच समजा. पण तरीही लग्न करताना आपली पत्नी कशी असावी, याच्या अनेक कल्पना तरुण रंगवतात. विशेषतः तिने आपली खूप काळजी घ्यावी आणि आपल्यावर खूप प्रेम करावे, असे तर प्रत्येकालाच वाटत असते. चाणक्यांनी मात्र परफेक्ट लाईफ पार्टनरची व्याख्या केलेली आहे.
प्रत्येकाला आपल्या पार्टनरमध्ये प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणाही अपेक्षित असतो. ज्यांच्या अपेक्षा जुळल्या ते आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात धरतात. चाणक्यनितीनुसार जी स्त्री आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करीत असेल आणि सतत त्याची काळजी करीत असेल अश्या स्त्रीचा हात आयुष्यभर सोडू नये. चाणक्य म्हणतात की अशी स्त्रीसोबत वाद झाला तरीही समजून घेतले पाहिजे. कारण अशी स्त्री आपल्या पार्टनरच्या चांगल्या वाईट-दिवसांमध्ये सोबत राहते.
ज्या स्त्रीचे दुसऱ्या कुणासोबत प्रेम संबंध नाहीत, तिच्यासोबतच विवाह केला पाहिजे, असे चाणक्य म्हणतात. स्त्रीवर दडपण आणून विवाह केला तर ती कधीच माने जुळू शकत नाही. त्यामुळे स्त्रीचे मन जाणून घेणे खूप आवश्यक आहे. चाणक्य म्हणतात की, अश्या स्त्री सोबत विवाह करावा जी तुमच्या मनाच्या सौंदर्याला महत्त्व देते. बाह्य सौंदर्य एका विशिष्ट्य कालावधीनंतर राहात नाही, मात्र चांगला स्वभाव आयुष्यभर असतो. स्वभावाला महत्त्व देणारी स्त्री आयुष्यभर साथ निभवते.