मुंबई – आर्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रात अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे. ह्या नीती आर्थिक संकट, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री आणि शत्रुत्वाशी संबंधित आहेत. चाणक्यांच्या नीती आजही प्रासंगिक आहेत. सुखी आणि सोपे जीवन जगण्यासाठी लोक या नियमांचे पालन करतात. आर्थिक स्थिती खालावण्यापूर्वी कोणते पाच संकेत मिळतात, याबाबत आर्य चाणक्यांनी आपल्या नीतींमध्ये सांगून ठेवले आहे. हे संकेत मिळताच लोकांनी सावध होणे आवश्यक आहे.
१) तुळशीचे रोप – हिंदू धर्मात तुळशीचे रोप सुकणे अशुभ मानले जाते. चाणक्यांनुसार, तुळशीच्या रोपांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तुळस सुकण्याची घटना आर्थिक स्थिती खालावण्याचे लक्षण आहे.
२) दररोज भांडण – चाणक्य सांगतात, ज्या घरात भांडण-तंटे सुरू असतात, तिथे लक्ष्मीचा वास नसतो. अशा घरांमध्ये होणारी कामे बिघडतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये नेहमीच मतभेद असतात. त्यामुळेच भांडण होऊ देऊ नये. नाही तर अपयशाचा सामना करावा लागेल.
३) काच फुटणे – चाणक्य सांगतात, काच फुटल्यामुळे आर्थिक तंगी येण्याचे संकेत मिळतात. घरात फुटलेली काच ठेवू नये. अशाने घरात दारिद्र्य येते.
४) पूजा न करणे – चाणक्य सांगतात, ज्या घरात पूजा-पाठ केला जात नाही. तिथे नकारात्मक शक्ती राहते. अशा घरांमध्ये दारिद्र्य येते. कुटुंबातील सदस्यांमध्ये संबंध खराब होतात. त्यामुळे घरातील वातावरण नेहमीच भक्तीमय ठेवले पाहिजे.
५) ज्येष्ठांचा अपमान – ज्या घरात ज्येष्ठांचा अपमान होतो, तिथे पैसा टिकत नाही. त्यामुळे ज्येष्ठ लोकांचा नेहमीच आदर केला पाहिजे.