पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – महान अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी एक धोरण तयार केले आहे, ज्यामध्ये त्यांनी संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा सखोल उल्लेख केला आहे. चाणक्य यांनी नेहमीच आपल्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. असे मानले जाते की, जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतो, त्याच्या जीवनात मोठी प्रगती होते. चाणक्यच्या मते, धावपळीच्या जीवनात जर एखाद्या व्यक्तीला आपल्या करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर त्याने या ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी-
प्रामाणिकपणा व शिस्त: आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर त्याने नेहमी आपल्या कामात प्रामाणिक आणि शिस्तबद्ध असले पाहिजे. जर तुमच्या जीवनात शिस्त नसेल तर तुम्हाला यश मिळू शकत नाही. म्हणूनच,यश मिळविण्यासाठी शिस्त असणे खूप महत्वाचे आहे. कारण व्यक्ती शिस्तबद्ध असेल तर काम वेळेवर पूर्ण करेल व कामाच्या ठिकाणी त्याला शाबासकी देखील मिळेल.
चांगली वागणूक: आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर त्याने आपले वर्तन नेहमी चांगले ठेवले पाहिजे. जे नागरिक या गोष्टींनी समृद्ध असतात, ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. म्हणूनच माणसाने नेहमी गोड बोलले पाहिजे आणि चांगले वागले पाहिजे. तसेच माणूस कठोर शब्द बोलून नव्हे तर वागण्याने व्यक्तीला आपले बनवू शकतो.
संकटकाळी धैर्य:
करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी व्यवसायात जोखीम पत्करण्यास नेहमी तयार असले पाहिजे. चाणक्य जी मानतात की, जो व्यक्ती जोखीम पत्करण्यास नेहमी तयार असतो, तो भविष्यात लवकर यश मिळवतो. कारण जर तुम्ही व्यवसायात जोखीम घेतली नाही, तर नवीन गुंतवणूक करणार नाही आणि तुमचा व्यवसाय पुन्हा वाढू शकणार नाही. त्यामुळे योग्य वेळी धोका पत्करावा.
टीमवर्क: चाणक्य यांचा असा विश्वास होता की, एखादी व्यक्ती कधीही एकट्याने यश मिळवत नाही, त्याच्याकडे नेहमी संघासोबत काम करण्याची प्रवृत्ती असायला हवी. कारण सगळ्यांना सोबत घेतल्याने सर्व काही व्यवस्थित होते. एक चांगला संघ कोणतेही काम सहजपणे करू शकतो आणि सर्वात कठीण उद्दिष्टेही एकत्रितपणे साध्य करू शकतो.
क्षमतांचे अचूक ज्ञान: आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीला त्याच्या क्षमतेची योग्य माहिती असली पाहिजे, तसेच नेहमी त्याच्या क्षमतेनुसार काम केले पाहिजे. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने अनेकदा नुकसान होते. अचूक काम केल्यास पैसा, धन, संपत्ती सोबतच सर्व क्षेत्रात प्रगतीची शक्यता असते.