पुणे – सकाळी सकाळी मोबाईलवर येणाऱ्या सुविचारांमधून यशस्वी जीवनाचे अनेक मंत्र आपल्याला मिळतात. पण खरा मंत्र आचार्य चाणक्यांनी दिला आहे. एखादी व्यक्ती जीवनात यशस्वी कशी होते किंवा ती यशस्वी जीवन कसे जगते, याचा परिपाठच चाणक्यांनी दिला आहे. चाणक्य नीतिचा अवलंब आपल्या जीवनात केला आणि त्यांनी सांगून ठेवलेल्या सवयींचे पालन केले तर तुम्हीही यशस्वी झालेच समजा. प्रत्येकालाच आपले आयुष्यभर कौतुक झाले पाहिजे, असे वाटत असते. पण त्यासाठी कोणत्या सवयी आवश्यक आहेत, हे चाणक्यांनी सांगून ठेवले आहे.
काळासोबत चालणारी व्यक्ती
जी व्यक्ती काळासोबत चालते, कुणासाठीच थांबत नाही, ते आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीत, असे चाणक्यांचे म्हणणे आहे. काळासोबत चालणाऱ्या लोकांचे सारेच कौतुक करतात, असे चाणक्य म्हणतात.
विनम्रता
आयुष्यात कामात आक्रमकता आणि स्वभावात विनम्रता असली पाहिजे, असे चाणक्य म्हणतात. विनम्र व्यक्तीचे सारेच कौतुक करतात. नम्रतेने वागणाऱ्या, बोलणाऱ्याला प्रत्येक ठिकाणी मान-सन्मान मिळतो. प्रत्येकाने ही सवय अवलंबली पाहिजे.
सकारात्मकता
तसेही आयुष्यात प्रत्येकाने सकारात्मकच असले पाहिजे. आचार्य चाणक्यांनी तर कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक राहणारे लोक कधीच अपयशी होत नाहीत, असे सांगून ठेवले आहे.
स्वच्छतेची सवय
स्वच्छतेची सवय असलेल्या लोकांचे सारेच कौतुक करीत असतात. आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की जी व्यक्ती स्वच्छतेची काळजी घेते ती आयुष्यात कधीच अपयशी होत नाही.