पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय इतिहासात आचार्य चाणक्य एक कुशल राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी म्हणून ओळखले जात होते. चाणक्य यांनी आपल्या धोरणांद्वारे एका साध्या मूलाला म्हणजेच चंद्रगुप्त यांना मौर्य घराण्याचा सम्राट बनविले. आर्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात वर्णन केलेल्या धोरणांचा अवलंब केल्याने एखादी व्यक्ती आपल्या जीवनातील अडचणींवर विजय मिळवू शकते.
आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकाद्वारे सांगितले आहे की, ज्या गोष्टींपासून जीवनात आनंद हिरावून घेतला जातो, त्यापासून अंतर ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला आजच्या काळातही चाणक्य नीति (धोरण ) उपयुक्त ठरणारी आहे. भारतीय इतिहासात राजनीती तज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ म्हणून आर्य चाणक्य यांचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये आपल्या धोरणांचे वर्णन केले आहे. ही धोरणे आजही सर्वांसाठी महत्त्वाची आहेत.
अनेक व्यक्ती चाणक्याच्या धोरणांचे पालन करतात त्यांना जीवनात यश मिळते.आचार्य चाणक्य यांनी वर्तनातून मानवाच्या जीवनाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यांचे पालन केल्याने कार्यक्षेत्रात नेहमीच सन्मान मिळतो. रोजच्या आयुष्यतील तुमचा त्रास कमी होईल. ऑफिसमध्ये होणाऱ्या सततच्या वादविवादाला पूर्णविराम मिळेल.
शिस्त असावी
व्यक्तीने आपल्या जीवनात शिस्त पाळली पाहिजे. ही गोष्ट कामाच्या ठिकाणीही अधिक लागू होते. प्रत्येक कामात निष्काळजी वृत्ती व दुर्लक्ष केल्याने ते कामाच्या जागी सहकाऱ्यांपेक्षा त्या मागे पडतात. अशा व्यक्तींना नेहमीच अपमानाला सामोरे जावे लागते. त्यामुळे जीवनात पुढे जायचे असेल किंवा क्षेत्रात मान-सन्मान मिळवायचा असेल तर शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे. शिस्त तुम्हाला आयुष्यात योग्य दिशा देईल.
निंदा टाळावी
आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणाचीही निंदा करणे टाळावे. टीका करणाऱ्यांनीही त्यांच्यापासून अंतर ठेवावे. तुम्ही टीका करण्यात तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. अशा लोकांचा कोणीही आदर करत नाही. इतरांबद्दल बोलण्यात वेळ वाया घालू नका.
नम्रता हवी
आपल्या कामाच्या ठिकाणी नेहमी शिष्टाचाराचे नियम पाळले पाहिजेत. आचार्य चाणक्य म्हणतात की जीवनात यश आणि सन्मान मिळविण्यासाठी वागण्यात नम्रता ठेवावी. सर्वांशी शांततेने बोलावे, असेही ते सांगतात.
गोड बोलावे
कोणत्याही माणसाचे बोलणे नेहमी गोड असावे. बोलण्यातून व्यक्तिमत्त्व ओळखले जाते. कोणत्याही गोष्टीसाठी कधीही कठोर शब्द वापरू नका. गोड बोलणारे लोक नेहमी लक्षात ठेवतात. या माणसांची सर्व कामे लवकर होतात.