पुणे – भारतीय इतिहासात राजनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ म्हणून आर्य चाणक्य यांचे महत्त्वाचे स्थान आहे. आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी आणि मुत्सद्दी होते, त्यांनी आपल्या धोरणांच्या मदतीने चंद्रगुप्तला मौर्य घराण्याचा सम्राट बनवले. त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये आपल्या धोरणांचे वर्णन केले आहे. ही धोरणे आजही सर्वांसाठी महत्त्वाची आहेत. जे लोक चाणक्याच्या धोरणांचे पालन करतात त्यांना जीवनात यश मिळते. परंतु चाणक्याने त्याच्या एका धोरणात म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या काही सवयींमुळे पैसा थांबत नाही. कोणत्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा नाही, जाणून घ्या..
उशिरापर्यंत झोपणे
चाणक्य सांगतात की जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात त्यांच्यावर माता लक्ष्मी कृपा करीत नाही. अशा लोकांना नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. चाणक्यच्या मते, जो माणूस सकाळी लवकर उठतो तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असतो.
शरीराची अस्वच्छता
चाणक्य म्हणतो की, जो माणूस स्वच्छ कपडे घालत नाही आणि दात स्वच्छ करण्याची काळजी घेत नाही. अशा लोकांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद नसतो. तसेच धार्मिक मान्यतेनुसार, ज्या ठिकाणी स्वच्छता नाही अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही.
कठोर शब्द बोलणारा
चाणक्य नितीच्या मते, नेहमी गोड बोलावे. गोड बोलणारी व्यक्ती सर्वांना प्रिय असते. कठोर बोलणारा माणूस लोकांशी चांगले संबंध ठेवू शकत नाही. तसेच माता लक्ष्मी नेहमी कडू बोलणाऱ्यांच्या घरात राहत नाही.
जास्त खाणे
चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीने कधीही जास्त खाऊ नये. अति खाण्यामुळे आरोग्य बिघडते. या व्यतिरिक्त काही रोग देखील त्यांना होतात. अशा लोकांना नेहमी पैशाची कमतरता भासते.