नागपूर – आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्र या ग्रंथात जीवनाच्या विविध पैलूंचे विवेचन केले आहे. चाणक्य यांनी नीतीशास्त्रात पैसा, प्रगती, विवाह, मैत्री, वैर आणि व्यापार आदी संबंधित समस्यांचे उपाय सांगितले आहेत. चाणक्य यांच्यानुसार, काही गोष्टी अशा असतात ज्या पत्नीला सांगू नयेत. कोणत्या गोष्टी पुरुषांनी पत्नींना सांगू नये हे जाणून घेऊयात.
दुर्बलता
चाणक्य सांगतात, पत्नीला कधीही पुरुषांनी आपली दुर्बलता सांगू नये. पत्नीला दुर्बलतेविषयी सांगितल्यास ती प्रत्येक बाबतीत याचा हवाला देऊन आपला हट्ट पूर्ण करून घेते. त्यामुळे पुरुषांनी आपली दुर्बलता लपवली पाहिजे.
अपमान
आपल्या अपमानाबाबत पत्नीला कधीही सांगू नये. महिला याच गोष्टीचे भांडवल करून पुन्हा पुन्हा अपमानाबाबत ऐकवतात.
दान
दान दिल्यानंतर आपल्या पत्नीला त्याबाबत सांगू नये. वाईट काळ आल्यानंतर याच दानाची आठवण महिला आपल्या पतीला वारंवार करुन देतात. तसेच वाईटसाईट बोलू शकतात.
मिळकत
चाणक्य सांगतात, पतीने आपल्या मिळकतीबाबत पत्नीला सांगायला नको. महिलांना मिळकतीबाबत माहिती असल्यास खर्चांवर बंदी आणू शकते. अनेक वेळा आवश्यक खर्चही करू देत नाही.