पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – असे म्हणतात की, ‘जीवनात सर्व सोंगे आणता येतात, परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही ! ‘ भारतीय संस्कृतीत पैशाला लक्ष्मी मानले आहे. त्यामुळेच दिवाळी सह अनेक सणाला लक्ष्मीचे पूजन करतात म्हणजेच पैशाचे धनसंपत्तीची पूजन करण्यात येते. प्रत्येकालाच असे वाटते की, आपल्याकडे बऱ्यापैकी पैसा असावा परंतु काही वेळा पैसा टिकत नाही त्यासाठी काय करावे ? या संदर्भात आर्य चाणक्य यांनी इतिहासकालात काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. त्याचा अवलंब केल्यास आपल्याला लक्ष्मी देवी तथा लक्ष्मी मातेचा नक्की सहवास लाभतो, असे म्हटले जाते.
लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणतात. देवी लक्ष्मीच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पैसा ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. उदरनिर्वाहासाठीही पैसा लागतो. धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. आचार्य चाणक्य नुसार देवी लक्ष्मी नेहमी काही ठिकाणी वास करते. जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे पैशाशी संबंधित समस्या कधीच येत नाहीत. कोणत्या ठिकाणी माता लक्ष्मीचा निवास नेहमी असतो हे जाणून घेऊ या…
स्वच्छता
आर्य चाणक्य सांगतात की, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरातील स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. घरात सुख-समृद्धी टिकून राहावी. ज्या घरांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो.
प्रेमळ
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, ज्या घरात संकटे किंवा भांडणे असतात, त्या घरांमध्ये माता लक्ष्मी वास करत नाही. या उलट ज्या कुटुंबात सदस्यांमध्ये स्नेह आणि पती-पत्नीमध्ये प्रेम असते त्या कुटुंबात लक्ष्मीचा वास असतो. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नेहमी ही गोष्टी लक्षात ठेवावी.
दान
शास्त्रात दानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जीवन सुधारण्यासाठी शास्त्रात गोड वाणी, मदत, मैत्री, दान आणि पुण्य इत्यादी सांगितले आहेत. चाणक्य सांगतात की, ज्या व्यक्ती दान करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. तसेच समाजिक कार्यात भाग घेणाऱ्यांवर माता लक्ष्मी कधीच अवकृपा करत नाही.
वाणी
चाणक्य सांगतात की लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी वाणीत म्हणजेच बोलण्यात गोडवा असणे आवश्यक आहे. कडू बोलणाऱ्यांवर माता लक्ष्मी कधीही कृपा करत नाही. तसेच चाणक्य सांगतात की, याशिवाय क्षेत्रात सर्वांशी एकरूप होऊन काम करणाऱ्यांना लवकर यश मिळते.