मुंबई – मित्र ही जीवनातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती समजली जाते. कोणतीही गोष्ट सुख – दुःख किंवा संकट असो की आनंदाचे क्षण असो ती गोष्ट मित्र जवळ आपण बोलतो किंवा व्यक्त करतो. त्यामुळेच रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्री श्रेष्ठ असे म्हटले जाते. परंतु खरा मित्र कसा असावा ? याचे काही दाखले इतिहासात सांगितलेले आहेत.
भारतीय इतिहासातील आर्य चाणक्य हे एक थोर राज्य – समाज आणि नीतिशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात ग्रंथात अनेक धोरणांचे वर्णन केले आहे. ही धोरणे एखाद्यास यशस्वी होण्यास तसेच योग्य मार्ग दर्शविण्यात मदत करतात. आर्य चाणक्य म्हणतात की, चांगल्या आणि वाईट मित्रांमध्ये फरक करणे कठीण आहे. एका श्लोकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे की ज्या गोष्टींमधून मित्र खरा आहे की नाही याची माहिती मिळते. त्यांनी मित्र कसा असावा याबाबत वर्णन केलेले असून त्यापैकी तीन गोष्टी जाणून घेऊ या…
मित्र हा खरा मार्गदर्शक
चाणक्य म्हणतात की, मित्र हा खरा मार्गदर्शक आहे आणि तोच चांगला मार्ग दाखवतो. जो मित्र चुकीच्या कृतींवर लक्ष ठेवतो आणि नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो, तोच खरा मित्र आहे. परंतु जो व्यक्ती फक्त आपल्या होयला होय म्हणतो तो कधीही आपला चांगला आणि खरा मित्र होऊ शकत नाही.
कोणत्याही परिस्थितीत अपमान करत नाही
चाणक्यच्या मते, खरा मित्र तोच आहे जो तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत अपमानित करीत नाही. काही लोक श्रीमंत झाल्यावर त्यांना एखाद्या गरीब मित्राबरोबर बोलण्यास लाज वाटते, परंतु ते पैशाशी जोडलेले असून आपले खरे मित्र असू शकत नाहीत.
प्रत्येक परिस्थितीत आपल्याला पाठिंबा देतो
नीतिशास्त्रानुसार, खरा मित्र तोच आहे जो प्रत्येक परिस्थितीत आपले समर्थन करतो. ही व्यक्ती नेहमी आपल्या संकटात मदतीला तयार असतो तोच आपला खरा मित्र असल्याचे सिद्ध करू शकतो.