इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चाणक्य यांनी घराच्या प्रमुखासाठी आवश्यक असणारे काही गुण सांगितले आहेत, ज्यामुळे कुटुंब नेहमी एकत्र राहते. घराच्या प्रमुखावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये आणि ते बिघडण्यामागे काही प्रमाणात घरप्रमुखाचा हात असतो. नातेसंबंध जपण्यासाठी घरच्या प्रमुखाची भूमिका महत्त्वाची असते.
महत्वाचे म्हणजे जर कुटुंब प्रमुखामध्येच काही दोष असतील तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. घरातील सर्व सदस्य चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात. चाणक्य यांनी घराच्या प्रमुखाविषयीचे आपले विचार मांडले आहेत. त्यांनी घराच्या प्रमुखासाठी आवश्यक असणारे काही गुण सांगितले आहेत, ज्यामुळे कुटुंब नेहमी एकत्र राहते.
तसेच घरच्या प्रमुखाचा प्रत्येक निर्णय केवळ त्याच्यावरच नाही तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतो, त्यामुळे त्याने प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. तसेच त्याच्यामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी. जेव्हा एखादी गोष्ट कुटुंबाच्या हिताशी निगडीत असेल तेव्हा घरच्या प्रमुखाने निर्णय घेण्यात गाफील राहू नये अन्यथा तुमच्या एका निर्णयामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
त्याचप्रमाणे चांगला कुटुंबप्रमुख घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन खर्च करतो. मग तो वैयक्तिक खर्च असो वा कौटुंबिक खर्च. जर कुटुंबप्रमुखच खर्च करताना नीट विचार करत नसेल, तर त्याचा परिणाम इतर सदस्यांवरही होतो आणि हळूहळू घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबाच्या अडचणीच्या वेळी कामी यावेत यासाठी पैसे वाचवा.
विशेषतः कुटुंबाचा प्रमुख शिस्तप्रिय असेल तर बाकीचे सदस्यही शिस्तीत राहतात. असे म्हणतात की मोठ्यांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही सवयींचा परिणाम मुलांवरही होतो. तसेच घरप्रमुखाच्या शिस्तीचा कुटुंबावर सकारात्मक परिणाम होतो. घरात शिस्त नसेल तर घरातील सदस्य कधीच एकमेकांचा आदर करत नाहीत. तसेच घरातील मुले चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात.
कोणताही घरच्या प्रमुखावर जबाबदाऱ्यांचे ओझे असते, त्यामुळे तो अनेकदा व्यस्त असतो. चाणक्य सांगतात की कुटुंबप्रमुख कितीही व्यस्त असले तरी त्यांनी कुटुंबासाठी वेळ नक्कीच द्यावा. कुटुंबियांचे म्हणणे ऐका आणि समजून घ्या. यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी समन्वय राखला जाईल, नातेसंबंध दृढ होतील आणि त्यांना त्यांच्या समस्या देखील सोडवता येतील. प्रत्येक समस्या संवादाने सुटते. यामुळे घरातील सदस्यांमधील मतभेदही टाळता येतात.
Chanakya Niti Family Chef Person Behavior Disputes
Principles Guidelines Philosophy