इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय इतिहासात आचार्य चाणक्य हे एक रणनीतीकार आणि महान अर्थशास्त्रज्ञ आणि विचारवंत म्हणून त्यांच्या धोरणांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य यांना समाजाची सखोल जाण होती, म्हणून त्यांनी एक धोरण तयार केले, ज्यामध्ये त्यांनी नागरिकांना आनंदी, यशस्वी आणि प्रतिष्ठित जीवन कसे जगावे हे सांगितले आहे.
चाणक्याची धोरणे आजच्या काळातही प्रासंगिक मानली जातात. असे मानले जाते की जो व्यक्ती आपल्या धोरणांचे पालन करतो, त्याला आयुष्यात कधीही अपयशाला सामोरे जावे लागत नाही. चाणक्यजींनी आपल्या नीतिशास्त्रात अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीने आपल्या मुलांसमोर आणि पत्नीसमोर कधीही करू नयेत.
शब्दांचा वापर
चाणक्यजींच्या मते, वाईट शब्द वापरल्याने सर्वात जास्त त्रास होतो, त्यामुळे पत्नी आणि मुलांसमोर शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी. कारण तुमच्या मुलांसमोर तुम्ही जसे वागाल तसेच ते तुमच्या व इतरांसमोर वागतील.
गैरवर्तन
आचार्य चाणक्य यांच्या मते आपण जे काही बोलतो किंवा कोणतीही क्रिया करतो. मुले त्याच्या प्रमाणे करतात. म्हणूनच आपण मुलांसमोर असभ्य भाषा वापरू नये तसेच पत्नीसोबत कधीही अपशब्द वापरू नये. कारण पत्नीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते.
प्रेम
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, आपल्या मुलांसमोर किंवा पत्नीसमोर अशा गोष्टी कधीही करू नका, ज्यामुळे तिला त्रास होईल. कारण वाईट कमेंट केल्याने मुलांचा आणि बायकोचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे घरात त्रास होतो. त्यामुळे घरात नातेसंबंध तणावमुक्त ठेवण्यासाठी पत्नीशी नेहमी प्रेमाने बोला.
शिस्त
चाणक्य मानतात की, जर तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचे असेल तर तुम्ही स्वतः शिस्त पाळली पाहिजे. तरच तुमची बायको आणि मुलं त्याच्या प्रमाणे करतील. तसेच, कुटुंबाशी नम्रतेने बोलले पाहिजे आणि रागापासून दूर राहावे. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.