नागपूर – मनुष्याने शांत जीवन जगण्यासाठी कोणत्याही वादात पडू नये, असे म्हटले जाते. पण जाणूनबुजून किंवा नकळत अनेकांच्या बरोबर वाद झाल्यास आपला गोंधळ उडतो. पण चाणक्य नीती सांगते की, असे ९ जण आहेत ज्यांच्याशी वाद किंवा भांडण करू नये. जर कोणी त्यांच्याकडून वाद करण्याचे धाडस केले तर त्याचा पराभव निश्चित आहे. अनेक राजे, सम्राटांनीही अशा लोकांना अनवधानाने विरोध करून राजेशाही गमावली आहे. आर्य चाणक्यांच्या धोरणाबाबत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आजही विचार करायला भाग पाडू शकतात.
चला जाणून घेऊ या बद्दल…
१) शास्त्रधारी
ज्याच्या हातात शस्त्र आहे, म्हणजेच जो शस्त्रधारी आहे, त्याच्याशी विरोध किंवा भांडण करू नये. कारण राग वाढला तर शस्त्र वापरून तो प्रतिस्पर्ध्याला मारू शकतो.
२) मार्मी म्हणजे मर्म जाणणारा
ज्या व्यक्तीला तुमची जिव्हाळ्याची गुपिते माहित आहेत, म्हणजे मार्मी किंवा बाळपणापासून जो माणूस जवळचा आहे, व ज्याला तुमची सर्व रहस्ये माहित आहेत, त्या व्यक्तीला विरोध करू नये. कारण असे म्हणतात की, विभीषणाला रावणाचे रहस्य माहित होते, त्याने ते सर्व रामाला सांगितले होते. याच कारणामुळे रावण युद्धात मारला गेला.
३) स्वामी
म्हणजे मालकाशी किंवा राजाशी वैर नसावे. त्याच्याकडे अफाट शक्ती असल्यामुळे तो तुमचे खूप नुकसान करू शकतो. त्यामुळे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो.
४) मूर्ख
बुद्धीहीन म्हणजेच मूर्ख व्यक्तीची संगत करू नये. किंवा वाद करू नये, शास्त्रात अशा व्यक्तींशी मैत्री करणे चांगले मानले जात नाही. एक मूर्ख माणूस त्याला स्वतःच्या हिताचे किंवा नुकसानीचे ज्ञान नाही, त्यामुळे तुम्हालाही त्रास होऊ शकतो.
५) श्रीमंत
एखाद्याने खूप श्रीमंत व्यक्तीशी वाद करू नये. कारण तो प्रसंगी कायदा आणि न्यायही विकत घेऊ शकतो.
६) वैद्य
वैद्य म्हणजे डॉक्टरांशी कधीही भांडण करू नये. अन्यथा तो तुम्हाला कधीही अडचणीत आणू शकतो.
७) चोर किंवा गुन्हेगार
गुन्हेगार किंवा इकडे तिकडे खबर देणारा वाईट अफवा पसरवू शकतो. अशा व्यक्तीचे वाईट करणे योग्य मानले जात नाही.
८) कवी
कवी, पत्रकार, वक्ते आणि लेखक यांनाही कवींच्या श्रेणीत घेता येईल. या लोकांशी वैर करू नका.
९) स्वंयपाकी
जो अन्न शिजवतो त्याच्याशी कधीही वाईट वागू नये. अन्यथा तुम्हाला तो हानिकारक अन्न देऊ शकते.