इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवनाचा मुलमंत्र दिला आहेच, शिवाय जीवनात कुठल्या गोष्टींचा अवलंब केल्याने सुखी होता येईल, याचाही मंत्र दिला आहे. चाणक्य हे राजकारण, शिक्षण आणि कुटनिती यातील तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी मनुष्याच्या पाच अश्या सवयींचा उल्लेख केला आहे ज्या त्याच्या आयुष्याला विनाशाकडे नेऊ शकतात. आपण या पाच सवयी जाणून घेऊया…
निष्काळजीपणा
निष्काळजीपणामुळे मनुष्याचे नुकसान होऊ शकते. कुठलेही काम सुरू करताना त्याची पूर्ण माहिती नसेल तर त्यापासून नुकसा होण्यापेक्षा इतरांकडून ज्ञान प्राप्त करणे योग्य आहे, असे चाणक्य म्हणतात.
आळस
आळस हा मनुष्याचे आयुष्य उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरू शकतो. माणसाने कायम शिस्तीत आयुष्य जगले पाहिजे. प्रत्येक काम वेळेत पूर्ण करायला हवे. आळस दूर केला तरच काम योग्य पद्धतिने होऊ शकते, असे चाणक्य म्हणतात.
व्यसन
वाईट गोष्टींचे व्यसन माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. त्यामुळे त्याची केवळ आर्थित स्थितीच बिघडत नाही तर मानसिक आणि शारीरिक नुकसानही होते. व्यसन करणारी व्यक्ती चुकीच्या लोकांसोबत राहायला लागते आणि त्यानंतर त्याचे आयुष्यही तसेच होऊन जाते, असे चाणक्य म्हणतात.
वाईट संगत
चाणक्य सांगतात की मनुष्याने नेहमीच वाईट संगतीपासून लांब राहिले पाहिजे. ज्याला वाईट संगत मिळते तो स्वतः सुद्धा वाईट होऊन जातो. चांगल्या लोकांसोबत राहिल्याने चांगली काम करतो आणि वाईट लोकांच्या संगतीत राहिल्याने वाईट कामे करतो, असे चाणक्य म्हणतात.
संभोग
संभोगाचे व्यसन लागणे योग्य नाही, असे चाणक्य म्हणतात. संभोगाचे व्यसन विकृतीचे लक्षण आहे आणि त्यामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या माणसाचे अस्तित्व नष्ट होते. त्यामुळे हे व्यसन सोडून देण्यातच माणसाचे भले आहे, असे चाणक्य म्हणतात.