इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर आज दुबईत भारतीय संघ विरुध्द न्यूझीलंडमध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडने २५२ धावांचे आव्हान भारतीय संघाला दिले आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांमध्ये ७ बाद २५१ धावा केल्या
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. भारत – न्यूझीलंड सामन्यासाठी खेळपट्टीची निवड करण्यात आली आहे. आज दुपारी २ वाजल्यापासून अंतिम सामना रंगायला सुरुवात झाली आहे. या साम्यात डॅरियल मिचेलने ६३ धावांची खेळी केली आहे. ब्रेसवेलने नाबाद ५३ धावा केल्या.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. वरुण चक्रवती, कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जडेचा व मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णदार) विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या,अक्षर पटेल रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.